🕒 1 min read
मुंबई : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर केलेल्या टिका केली होती. त्याचे आज सभागृहात प्रचंड पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. कुणी तरी सांगितले 2 बिस्किटे देतो. जा त्याला चाऊन ये. त्याला चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव आहे, असे नितेश राणे म्हणाले होते. यावरुन सभागृहात मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.
शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी नितेश राणेंच्या कृत्यावर आक्षेप घेत त्यांचे कायमचे निलंबन करावे अशी मागणी धरत जोरदार टीका केली आहे. दरम्यान यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांना उत्तर देत छगन भुजबळांचा अपमान केल्याची आठवण करुन दिली आहे.
या सभागृहात अध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्याकडे पहायचंच नाही असा नवा पायंडा सुरु झाला आहे का? ठरवून निलंबन केलं जात अल्याचं दिसत आहे. आम्हाला हरकत नाही, आम्ही लोकशाहीत लढणारे लोक आहोत, रडणारे नाही. नितेश राणे यांच्या संदर्भात आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.
कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही सदस्याने असं वागू नये सांगितलं आहे. पण आता भास्कर जाधव तुम्ही विषय काढला आहे म्हणून निदर्शनास आणू देतो की, याच सभागृहात भुजबळ साहेब तिकडे बसायचे आणि भास्कर जाधवांसहित आम्ही सगळे इकडे बसायचे तेव्हा हुप हुप करणाऱ्यांमध्ये भास्कर जाधवही होते. हे या सभागृहाने पाहिले आहे, अशी आठवण फडणवीसांनी यावेळी करुन दिली आहे.
चंद्रकांत पाटलां(Chandrakant Patil)ची घोषणा होती आहे तसा घेऊ आणि पाहिजे तसा घडवू. तुम्ही त्यांना घडवले की तुम्हाला त्यांनी घडवले हे सांगण्याची गरज आहे. त्याचवेळी त्यांनी थांबवायला पाहिजे होते. त्यांनी थांबवले नाही म्हणून काळ सोकावला आहे. अशा सदस्याला कायमस्वरुपी निलंबित करा अशी माझी मागणी आहे, असे भास्कर जाधव म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- विधानसभेत पुन्हा गदारोळ: “तो चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव”
- नितेश राणेंच्या अटकेबाबत संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
- नितेश राणे संदर्भात सरकारला काय करायचे ते करावं-नारायण राणे
- दोषी कोणी असो कारवाई व्हायलाच हवी- केशव उपाध्ये
- “इतका अभ्यास बरा नाही, त्याचं ओझं झेपलं पाहिजे”, राऊतांनी काढला राज्यपालांना चिमटा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
