🕒 1 min read
मुंबई : आज प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की, ‘भारतातल्या कुठल्याही राज्य सरकारने जे आजवर कधीही केले नाही, ते मविआ सरकारने करून दाखवले आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, विद्यार्थ्यांचे भविष्य, शेतकऱ्यांचा पीकविमा, पूरग्रस्तांना नुकसानभरपाई अशा प्रत्येक विषयात मविआ सरकार घालत असलेल्या गोंधळावर पीएचडी करता येईल’, असे म्हणत पाटलांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
भारतातल्या कुठल्याही राज्य सरकारने जे आजवर कधीही केले नाही, ते मविआ सरकारने करून दाखवले आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, विद्यार्थ्यांचे भविष्य, शेतकऱ्यांचा पीकविमा, पूरग्रस्तांना नुकसानभरपाई अशा प्रत्येक विषयात मविआ सरकार घालत असलेल्या गोंधळावर पीएचडी करता येईल. pic.twitter.com/bOQMmYpdn4
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 27, 2021
दरम्यान, कणकवलीत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत (Satish Sawant) यांचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब (Santosh Parab) यांच्यावरील चाकूहल्ल्या प्रकरणी भाजपा नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर संशयाची टांगती तलवार असून २१ डिसेंबर रोजी पोलिसांनी त्यांची अर्धा तास चौकशी केली. त्यामुळे नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुद्द्याविषयी बोलत असतांना पाटील म्हणाले की,’आपल्याविरोधात उठणारा आवाज दाबण्यासाठी हे सरकार वारंवार असंवैधानिक मार्गांचा वापर करते. नितेश राणे यांचा आवाज दडपण्याचे प्रयत्न केले जात आहेत, परंतु त्यांना उत्तर देण्यासाठी राणे परिवार व भाजपा समर्थ आहे.’ तसेच ठाकरे सरकारने नितेशजींना अटक केली, तरीही न्यायालयात ही कारवाई टिकणार नाही.’
महत्त्वाच्या बातम्या
- ओबीसी आरक्षणा संदर्भात विधिमंडळात महत्वाचा ठराव मंजूर; छगन भुजबळांची माहिती
- ‘…त्यामुळे अशा देणग्या गोळा कराव्या लागतात राऊत साहेब’, राऊतांच्या टीकेवर भातखळकरांचे प्रत्युत्तर
- ‘विरोधकांच्या हातातील ‘पुंजी’ कुजवून अडचणी याव्यात हाच भाजपचा उदात्त हेतू’
- ‘जनतेकडून पक्षाच्या तिजोरीत पैसे गोळा करून देश बलाढ्य करण्याचे हे कोणते सूत्र?’
- …तर राज्यात लॉकडाऊन लावण्यात येईल- भारती पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
