Share

बडतर्फीची कारवाई अधिक तीव्र करणार; अनिल परब यांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार आवाहन करुनही एसटी कर्मचारी अद्यापही कामावर रुजू होत नाहीत. अनिल परब यांनी अनेकदा अल्टिमेटम दिला होता. मात्र तरीही एसटी कर्मचारी कामावर हजर होत नसल्याने कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा इशारा दिला आहे.

एसटी कामगारांचे जसे आमच्यावर दायित्व आहे. तसंच जनतेचंही दायित्व आमच्यावर आहे. त्यामुळे एसटी कामगारांनी आणखी ताणून धरू नये. त्यांनी कामावर हजर व्हावे. 2 महिन्याचा पगार मिळाला नाही तर एसटी कामगारांचेच नुकसान होणार आहे. कोण्या नेत्याचे नुकसान होणार नाही, असे सांगतानाच बडतर्फीची कारवाई सुरू झाली असून ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे, असा इशारा मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.

कर्मचाऱ्यांना 41 टक्के पगारवाढ दिली आहे. ताणून धरू नका. एका शब्दावर आडून बसू नका. बडतर्फीची कारवाई सुरू झाली आहे. आता एसटी विरोधातील कारवाई तीव्र करावी लागेल. जनतेलाही उत्तर द्यायचे आहे. एसटी ही अत्यावश्यक सेवेत आहे. त्यामुळे कामावर हजर रहा, असे अनिल परब म्हणाले आहेत.

दरम्यान, अनिल परब यांनी अनेकदा कारवाई करण्याचा इशारा देऊनही कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यानंतर कारवाई देखील करण्यात आली. आता अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच कारवाईचा इशाराही दिला आहे. एसटी कर्मचारी कामावर हजर राहतील का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!