🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान याला सर्पदंश झाल्याची माहिती समोर आली आहे. सलमान खानचा वाढदिवस येत्या 27 तारखेला आहे. तो त्याच्या वाढदिवसानिमित्त कामोठेच्या फार्महाऊसवर होता. त्यावेळी ही घटना घडल्याची महिती समोर आली आहे. सलमान खान (Salman Khan) च्या फार्महाऊसवर नेहमीच पार्टी सुरू असतात.
लॉकडाऊनच्या काळातही तो याच ठिकाणी होता. याच फार्महाऊसवर सलमानला सर्पदंश झाला आहे. परंतू बिनविषारी साप असल्याने अनर्थ टळला असल्याचेही बोलले जात आहे. (Salman Khan Farmhouse)
वाढदिवसानिमित्त सलमान खान सध्या त्याच्या कामोठे जवळील फार्महाऊसवर पार्टासाठी गेला आहे. मात्र यावेळी त्याला सर्पदंश (Snake bite) झाला आहे. त्याला तत्काळ कामोठेच्या एमजीएम रुग्णालयात (MGM Hospital Kamothe) दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, साप बिनविषारी असल्याने मोठा अनर्थ टळला. सलमानची प्रकृती स्थिर आहे. यासंबंधी डॉक्टरांनी बोलण्यास नकार दिला असून कमालीची गुप्तता बाळगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोदीजींची ही ‘त्रिसूत्री’ कोरोनाविरोधी लढा नक्कीच बळकट करेल- चंद्रकांत पाटील
- “नवाब मलिकांची भूमिका संघासारखी”, प्रकाश आंबेडकरांची टीका
- “स्वतःला ‘देव’ म्हणवून घेणारे तोऱ्यात वावरत आहेत”, राऊतांचा राेखठोकमधून मोदींवर प्रहार
- “लोकसभेच्या गॅलरीतून डोकावणारे पत्रकार ही लोकशाहीची खरी…”, लोकसभेत पत्रकार बंदीवर राऊतांची टीका
- ‘खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले’, शिवसेना आ.चंद्रकांत पाटील यांचे टीकास्त्र
- पंतप्रधान मोदींची घोषणा; ‘या’ तारखेपासून सुरु होणार १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
