Share

“मातीसाठी राबणाऱ्या माणसाची माती केलीय या सरकारने”, सदाभाऊंचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) आज पाचवा दिवस आहे. विरोधकांनी विविध मुद्द्यांवरुन प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) घेरले आहे. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शेतीच्या वीजबिलासह इतर प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सदाभाऊ खोत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना म्हणाले, या ठिकाणी बोललं गेलं की आमचं सरकार शेतकऱ्यांना मदत करतं, एव्हडी मदत चालली आहे की, विजेचे बिले चार पट पाच पट वाढवण्यात आली आहेत. यावर मात्र सरकार बोलायला तयार नाही. मातीसाठी राबणाऱ्या माणसाची माती केलीय या महाविकास आघाडी सरकारने. अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत, वीज बिल, एसटी कर्मचारी आंदोलन, विदर्भ मराठवाडा निधीवाटप, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प आदी प्रश्नाबाबत विरोधक आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी माझ्या अनेक प्रश्नांना बगल दिली अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!