Share

एसटी कर्मचारी संपावर ठाम; अनिल परब आज माध्यमांशी साधणार संवाद

Published On: 

मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन जवळपास महिनाभरपासून सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ केली असली तरी आंदोलक विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर ठाम आहेत त्यामुळे आंदोलन  मागे घेण्यास ते तयार नाहीत. अशातच परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांनी कामावर आलात तरच वेतन दिले जाईल, असा इशारा देखील दिला होतो.

तसेच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची देखील कारवाई केली जात आहे. त्यानुसार बुधवारपर्यंत महामंडळातील तब्बल १० हजार ३० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर रोजंदारीवरील दोन हजार २७ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. मेस्मा कायद्या अंतर्गत (mesma) कारवाईचे परिवहन मंत्र्यांनी संकेत देऊनही एसटी कर्मचारी संप मागे घ्यायला तयार नाहीत.

दरम्यान, संप सुरुच असल्यामुळे गेले कित्येक दिवस लालपरी रस्त्यांवर धावली नाही. परंतु काही भागात अशंत: पोलिसांच्या बंदोबस्तात एसटी चालू झाल्याचे देखील दिसले. एसटी बंद असल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच याचा सर्वसामन्य नागरीकांना देखील प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे.

याप्रकरणी आज परिवहन मंत्री अनिल परब माध्यमांशी बोलणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच परिवहन मंत्री एसटी संघटनाशी देखील चर्चा करून संप थांबविण्यासाठी काय तोडगा काढणार याकडे लक्ष देणार आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!