मुंबई : शिवसेनेचे नेते रामदास कदम सध्या पक्षामधील काही मंत्र्यांवर नाराज असल्याचे दिसत आहे. रामदास कदमांच्या नाराजीवरुन पक्षांतर्गत वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. रामदास कदम यांनी खदखद व्यक्त करताना अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयावरही सवाल केला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेतील अनेक नेत्यांना धारेवर धरले आहे. त्यांच्यावरील आरोप खोडून काढतानाच अनिल परब यांच्यामुळे पक्ष रसातळाला जात असल्याचंही स्पष्ट केलं आहे.
माझ्यामुळे मी पक्षाला कोणताही त्रास होऊ देणार नाही. नगर परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यावर पुढचा निर्णय घेईल. नगर परिषदेच्या निवडणुकीत आम्ही गद्दारी करणार नाही, असं सांगतानाच उद्धव साहेबांना हात जोडून विनंती आहे की, तुम्ही या प्रकरणात लक्ष घाला. अनिल परब यांच्या डोक्यात मस्ती गेली आहे. हवा गेली. त्यांचे पाय जमिनीवर नाही. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. त्यात परब यांना हरामखोर म्हटलं. या हरामखोराला आवरा, असं म्हटलं आहे, असंही रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
या पुढे आमदारांना निधी देणार नाही असं अनिल परब म्हणाले होते. हा काय अनिल परब यांच्या बापाचा पैसा आहे का? तुम्ही शपथ घेतली त्याचा भंग केला. मी बघेन. उद्धवजींना विचारून घे…तो जिल्हा नियोजन निधीचा पैसा आहे. तुझा नाही. आमदारांचा हक्क आहे. तो निधी मिळाला नाही तर मी कोर्टात जाईल, असा एकेरी उल्लेख करत रामदास कदम यांनी अनिल परब यांना इशाराच दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- देसाईंना मंत्रिपद दिल्याचं वाईट वाटलं; रामदास कदमांची खदखद
- ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना छोटी गोष्ट’; ‘या’ मुख्यमंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य
- भातखळकरांच्या ‘त्या’ टीकेवर सचिन सावंत यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, ‘इंग्रजांचे पाय…’
- सहकारातील अडचणी दूर करण्यासाठी अमित शहांचा महाराष्ट्र दौरा- देवेंद्र फडणवीस
- …हे नाकर्ते खंडणी सरकार अजून किती विद्यार्थ्यांचा बळी घेणार आहे?- अतुल भातखळकर


