Share

‘माझ्या हत्येचा कट, यात जयंत पाटील, पोलीस अधिकारीही सामिल’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी वैयक्तिक सुरक्षा रक्षक न स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर महिन्यात आटपाडीमध्ये झालेली शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून झालेला हा हल्ला सुनियोजित कट होता असा दावाही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत हा गंभीर आरोप केला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी पोलीस प्रशासन आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. गोपीचंद पडळकर यांनी हा गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी ७ नोव्हेंबर रोजीचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. हा हल्ला आटपाडी पोलीस चौकीच्या समोर घडवून आणल्याचा दावा त्यांचा आहे. हा हल्ला सुनियोजित होता, असेही गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

या हल्ल्याच्या कटात जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पूर्णपणे सामिल आहेत. त्यांनी या कारवाईच्या नावाखाली माझ्या बॅाडीगार्डलाच निलंबित केले असून उलट माझ्यावरच 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक्षक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यावरील विश्वास उडाला असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

माझी कार ज्या दिशेने येत होती, त्याच्या दुसऱ्या बाजूने दोनशे लोकांचा जमाव लाठ्या-काठ्यांसह उभा होती. पहिल्यांदा माझ्या कारवर दगड फेकायचे, मग माझ्या कारचा वेग कमी होताच, भरधाव वेगाने ट्रक अंगावर घालायचा आणि मग जमावाकडून हल्ला करायचा, असा सुनियोजित कट होता, असा दावा गोपीचंद पडळकर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमधून केला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी पोलिसांवरही आरोप केला आहे. या सर्व हल्ल्याचे चित्रिकरण करताना पोलीस या व्हिडिओत दिसत आहेत. हा सगळा कट पोलिसांच्या संरक्षणात घडवून आणला जात आहे, असेही गोपीचंद पडळकर यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!