Share

रामदास कदमांच्या टीकेवर अनिल परबांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) सध्या पक्षामधील काही मंत्र्यांवर नाराज असल्याचे दिसत आहे. रामदास कदमांच्या नाराजीवरुन पक्षांतर्गत वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. रामदास कदम यांनी खदखद व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लिहलेल्या पत्रामध्ये राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचा हमारखोर असा उल्लेख केला आहे. त्यावर आता अनिल परबांनी उत्तर दिले आहे.

माझ्यामुळे मी पक्षाला कोणताही त्रास होऊ देणार नाही. नगर परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यावर पुढचा निर्णय घेईल. नगर परिषदेच्या निवडणुकीत आम्ही गद्दारी करणार नाही, असं सांगतानाच उद्धव साहेबांना हात जोडून विनंती आहे की, तुम्ही या प्रकरणात लक्ष घाला. अनिल परब यांच्या डोक्यात मस्ती गेली आहे. हवा गेली. त्यांचे पाय जमिनीवर नाही. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. त्यात परब यांना हरामखोर म्हटलं. या हरामखोराला आवरा, असं म्हटलं आहे, असंही रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

मला ते काहीही बोलले तरीही, माझ्यावर लावलेल्या आरोपांवर मी काहीही बोलणार नाही. ते शिवसेनेचे नेते आहेत. मी शिवसैनिक आहे. ते शिवसेनेचे नेते आहेत. याबाबत काय दखल घ्यायची ती पक्ष घेईल, असे अनिल परब म्हणाले आहेत.

रामदास कदम यांनी केलेले आरोप आणि टीकेबाबत पत्रकारांनी अनिल परब यांना प्रश्न विचारला. त्यावेळी बोलताना परब म्हणाले की, ‘मी याबाबत काही बोलू इच्छित नाही. माझ्यावर काही जरी आरोप केले तरी त्याचं उत्तर मी देणार नाही. मी शिवसैनिक आहे, ते शिवसेनेचे नेते आहेत. याबाबत जी काही दखल घ्यायची ती पक्ष घेईल’. रामदास कदमांच्या टीकेला प्रत्युत्तर देणं अनिल परब यांनी टाळल्याचं यावेळी पाहायला मिळालं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!