🕒 1 min read
मुंबई : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान सत्ताधारी विरोधकांमध्ये तुफान टोलेबाजी पाहायला मिळत असतेच पण यंदा एका विचित्र प्रकरणावरुन वाद सुरु आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे.
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे विधानभवनामध्ये जात आणि विधानभवनाच्या बाहेर आंदोलन करत असताना भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी म्याव म्याव असा आवाज करत खिल्ली उडवली. मात्र आदित्य ठाकरेंनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता विधानभवनामध्ये निघून गेले आहे.
नितेश राणेंनी म्याव म्याव केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर शिवसेनेकडून त्याला सडेतोड उत्तर देण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एक फोटो ट्वीट करत नितेश राणेंची खिल्ली उडवली.
नवाब मलिकांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये कोंबडीच्या शरीराला मांजराचा चेहरा लावून पहचान कौन असे कॅप्शन दिले आहे. त्यावर नितेश राणे यांनी देखील माघार न घेता आज वराहच्या तोंडाला एडिट करत नवाब मलिकांवर टीका केली. आज शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
म्याव म्याव करून चिडवणे हा सिंधुदुर्गचा अपमान आहे. कोकणची संस्कृती अशी नाही. नितेश राणेंचा तो बालिशपणा. या कोकणाने आदर्श परंपरा निर्माण केली आहे त्याचे भान म्याव म्याव करणाऱ्यांनी राखायला हवे होते. स्वतःतील पोरकटपणा, बालिशपणा दाखवण्याचा तो विद्रूपपणा होता. नितेश राणेंच्या वागण्याने सिंधुदुर्गवासीयांची मान खाली गेली आहे, अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- “सफाई कामगाराने आत्महत्या केली, आता ३ जणांचे निलंबन करुन काय फायदा?”
- शाळेबाबत अद्याप निर्णय नाही; राजेश टोपेंची माहिती
- …म्हणून मेनका गांधींनी माझी भेट घेतली; आव्हाडांनी केला त्या भेटीचा खुलासा
- केंद्र सरकार पुन्हा कृषी कायदे आणण्याच्या तयारीत?; केंद्रीय कृषीमंत्र्यांचं धक्कादायक वक्तव्य
- रवी शास्त्रींच्या ‘त्या’ वक्तव्याचे माजी क्रिकेटरने केले समर्थन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
