Share

‘अतरंगी’ फोटो शेअर करत नवाब मलिकांनी अप्रत्यक्षपणे उडवली नितेश राणेंची खिल्ली

Published On: 

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला २२ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. हे अधिवेशन दरवर्षी नागपुरला होते परंतु यंदा ते मुंबईत होणार आहे. तसेच नेहमीप्रमाणे यंदाच्याही हिवाळी अधिवेशनाची सुरुवात तापलेल्या वातावरणाने झाली आहे. काल(२३ डिसें.) या अधिवेशनादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे बघायला मिळाले. या व्हिडिओमध्ये शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) सभागृहात दाखल होताच भाजप नेते नितेश राणे यांनी ‘म्याव म्याव’चा आवाज काढला, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक(Nawab Malik) यांनी एक अनोखा फोटो शेअर करत नितेश राणेंची अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवली आहे. मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला असून पैहचान कौन ? असे म्हंटले आहे. या फोटोमध्ये शरीर कोंबडीचे असून चेहरा मात्र मांजरीचा वापरण्यात आला आहे. त्यामुळे नवीन वादाला सुरुवात होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

दरम्यान, विधिमंडळाचे कालचे कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजपचे आंदोलन सुरू असतांना भाजपकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. यामध्ये नितेश राणे यांनी देखील सहभाग नोंदवला. आंदोलनावेळी घोषणाबाजी सुरु असतांनाच शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सभागृहात दाखल झाले. त्यावेळी लगेच नितेश राणे यांनी ‘म्याव म्याव’चा आवाज काढला. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना डिवचण्यासाठीच नितेश राणेंनी अशी घोषणाबाजी केल्याच्या चर्चांना विधानभवनात उधाण आले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!