मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला २२ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. हे अधिवेशन दरवर्षी नागपुरला होते परंतु यंदा ते मुंबईत होणार आहे. तसेच नेहमीप्रमाणे यंदाच्याही हिवाळी अधिवेशनाची सुरुवात तापलेल्या वातावरणाने झाली आहे. काल(२३ डिसें.) या अधिवेशनादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे बघायला मिळाले. या व्हिडिओमध्ये शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) सभागृहात दाखल झाले होताच भाजप नेते नितेश राणे यांनी ‘म्याव म्याव’चा आवाज काढला, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
याच पार्श्वभूमीवर आता नितेश राणेंनी ‘म्याव म्याव’चा आवाज का काढला याचे कारण स्पष्ट केले आहे. यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना नितेश राणे म्हणाले की,’मी म्याव म्याव केलं कारण शिवसेनेची अवस्थाच म्याव म्यावसारखी झाली आहे. ही अवस्था कशामुळे झाली हे त्यांनी शोधलं पाहिजे. आधी वाघाची डरकाळी देणारी शिवसेना आणि आता म्याय म्याव करणारी शिवसेना आहे.’
दरम्यान, विधिमंडळाचे आजचे कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजपचे आंदोलन सुरू असतांना भाजपकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. यामध्ये नितेश राणे यांनी देखील सहभाग नोंदवला. आंदोलनावेळी घोषणाबाजी सुरु असतांनाच शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सभागृहात दाखल झाले. त्यावेळी लगेच नितेश राणे यांनी ‘म्याव म्याव’चा आवाज काढला. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना डिवचण्यासाठीच नितेश राणेंनी अशी घोषणाबाजी केल्याच्या चर्चांना विधानभवनात उधाण आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध, रात्री जमावबंदी; आज होणार नवीन नियमावली जाहीर
- “तेव्हा बघ्याची भूमिका घेणारे फडवणीस सभागृहात मोदींची नक्कल होताच….”; रुपाली पाटलांची टीका
- द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ‘विराट’सेनेचे फोटोशूट : पहा व्हिडिओ
- महाराजस्व अभियानांतर्गत विशेष मोहिम… शेतकऱ्यांना मिळणार ‘हे’ महत्वाचे पाच लाभ
- वेंगसरकरांचे गांगुली-विराटबाबत मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

