Share

नवाब मलिकांच्या ‘अतरंगी’ फोटोनंतर नितेश राणेंनी शेअर केला ‘हा’ फोटो; म्हणाले,‘ओळखा पाहू कोण?’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला २२ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. हे अधिवेशन दरवर्षी नागपुरला होते परंतु यंदा ते मुंबईत होणार आहे. तसेच नेहमीप्रमाणे यंदाच्याही हिवाळी अधिवेशनाची सुरुवात तापलेल्या वातावरणाने झाली आहे. गुरुवारी(२३ डिसें.) या अधिवेशनादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे बघायला मिळाले. या व्हिडिओमध्ये शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) सभागृहात दाखल होताच भाजप नेते नितेश राणे(Nitesh Rane) यांनी ‘म्याव म्याव’चा आवाज काढला होता. त्यामुळे राणेंवर टीकास्त्रांचा वर्षाव होण्यास सुरुवात झाली.

असे असतांनाच काल(२४ डिसें.) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक(Nawab Malik) यांनी एक अनोखा फोटो शेअर करत नितेश राणेंची अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवली आहे. मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला असून पैहचान कौन ? असे म्हंटले आहे. या फोटोमध्ये शरीर कोंबडीचे असून चेहरा मात्र मांजरीचा वापरण्यात आला आहे. मलिकांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता नवाब मलिकांच्या टीकेला नितेश राणेंनी जश्याच तसे उत्तर दिले आहे. यासंदर्भात नितेश राणेंनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक आगळावेगळा फोटो शेअर केला आहे. तसेच त्या फोटोला कॅप्शन दिले आहे की,’ही प्रजाती फक्त भंगारात आढळते…ओळखा पाहू कोण?’, असे ते म्हणाले आहेत.

दरम्यान, गुरुवारी विधिमंडळाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजपचे आंदोलन सुरू असतांना भाजपकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. यामध्ये नितेश राणे यांनी देखील सहभाग नोंदवला. आंदोलनावेळी घोषणाबाजी सुरु असतांनाच शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सभागृहात दाखल झाले. त्यावेळी लगेच नितेश राणे यांनी ‘म्याव म्याव’चा आवाज काढला. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना डिवचण्यासाठीच नितेश राणेंनी अशी घोषणाबाजी केल्याच्या चर्चांना विधानभवनात उधाण आले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!