🕒 1 min read
मुंबई : माझे वडील स्व. पंडितअण्णा मुंडे यांनी एकेकाळी ऊस तोडलेला आहे. ऊसतोड कामगारांच्या व्यथा मी जाणतो. म्हणूनच स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांचे व त्यांच्या पाल्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकार म्हणून आम्ही जे काही करतो आहोत, ते फार करत आहोत असे नाही तर कर्तव्य समजून करत आहोत अशी भावना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.
माझे वडील स्व. पंडितअण्णा यांनी एकेकाळी ऊस तोडलेला आहे,ऊसतोड कामगारांच्या व्यथा मी जाणतो.ऊसतोड कामगारांचे व त्यांच्या पाल्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकार म्हणून आम्ही जे काही करतो आहोत, ते फार करत आहोत असे नाही तर कर्तव्य समजून करत आहोत. #विधानपरिषद अल्पकालीन चर्चा #Budget2021
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 9, 2021
विधानपरिषदेत आमदार सुरेश धस, आमदार विनायक मेटे या सदस्यांनी अल्पकालीन चर्चेदरम्यान प्रश्न उपस्थित केले होते. त्याला धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले. राज्य सरकारने स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास बळकटी दिली आहे. यामार्फत ऊसतोड कामगारांची नोंदणी करून त्यांना आरोग्य विमा कवच, महिलांना आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने विविध योजना, पशूंना विम्यासह विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही पुढील तीन महिन्यांच्या आत करण्यात येईल.
ऊसतोड कामगारांची संख्या अधिक असलेल्या सहा विधानसभा क्षेत्रात ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबा यांच्या नावाने सर्व सुविधायुक्त सहा निवासी शाळा ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी उभारण्यात येतील. ऊसतोड कामगार नेते, संघटना, कामगार प्रतिनिधी, कारखानदार आदींशी याविषयी व्यापक चर्चा करण्यात येईल.
तसेच स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला ऊस गाळपामागे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्याचे जाहीर करण्यात आले.या निधीतून ऊसतोड कामगारांची नोंदणी, विमा संरक्षण, पशूंचा विमा, महिलांचे आरोग्य सर्वेक्षण व उपाययोजना आदी योजना येत्या तीन महिन्यात कार्यान्वित करण्यात येतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाने शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम थांबवली
- खा.जलील यांच्या कार्यालयामागील इमारत जमीनदोस्त
- रुग्णसंख्या वाढली! सोयगावचे कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू
- पाचशे रुपयांवरून दोन पोलिसांत तुंबळ हाणामारी
- औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्क्यांच्या वर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
