🕒 1 min read
औरंगाबाद : सध्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील कोविड सेंटर पुन्हा उघडण्याची वेळ आली आहे. मागील तीन महिन्यात तालुक्यात एकही रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे सेंटर धूळखात पडले होते. मात्र, सोमवारी यात एका रुग्णास उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सोयगाव तालुक्यात जरंडी येथे एकमेव कोरोना सेंटर आहे. काल अचानक दोन आरोग्य कर्मचाऱ्यांसह नवे पाच कोरोनाचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये पूर्ववत उपचार सुरु करण्यात आले आहे. सोयगाव तालुक्यात पुन्हा कोरोना रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून सर्वानी कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी सरकारी नियमाचे पालन करण्याचे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
सोमवारी दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णामुळे सेंटरची सुरक्षा देखील पुन्हा वाढवण्यात आली आहे. आरोग्य विभागाला या कोविड केंद्राची जबाबदारी देण्यात आली असून यासाठी तात्पुरती तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- रणबीर कपुर आणि संजय लीला भन्साळी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने आलिया भट्ट क्वारंटाईन
- पेट्रोल-डिझेल ७५ रुपयांवर येणार? अनुराग ठाकुर यांनी राज्यसभेत दिलं उत्तर
- वर्धापन दिनी राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना ऑडिओच्या माध्यमातून संदेश
- अधिवेशन एक दिवसाने वाढवा; विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसचं ठरलंय !
- ‘होय मी सीडीआर मिळवला, माझी चौकशी कराच, मात्र त्यांना सोडू नका’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
