Share

कोरोनाने शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम थांबवली

Published On: 

औरंगाबाद : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अंतर्गत १ ते १० मार्चदरम्यान जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबवण्यात येणार होती. मात्र, सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही मोहीम २० मार्चपर्यंत थांबवण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी दिली.

शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने १ ते १० मार्च या कालावधीत विशेष मोहीम हाती घेतली होती. यात ३ ते ६ आणि ७ ते १७ वयोगटातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले जाणार होते. या मोहिमेत वेगवेगळ्या विभागाच्या समन्वयातून विविध वयोगटातील शाळाबाह्य मुलांचा शोध घेणार होते. यात सरकारी, खासगी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार होती.

शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध समित्यांचे गठण करण्यात आले होते. परंतु, जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या मोहिमेलादेखील तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. कोरोना परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करणार असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!