औरंगाबाद : शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा गतीने पसरतो आहे. कोरोना संसर्ग वाढत असतांना महापालिका प्रशासनाने पाहिजे त्या प्रमाणात कोरोना चाचण्यांची गती वाढवलेली नाही. त्यामुळे कोरोनाचे रूग्ण उशीराने समोर येत असून संसर्ग वाढण्यास खतपाणी मिळत आहे. सध्या रोजच्या ११०० ते १२०० चाचण्या केल्या जात आहे. मात्र तिनशेपेक्षा अधिक रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघत असल्याने पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्क्यांच्याही वर गेला आहे.
साधारणतःसाधारणतः १४ फेब्रुवारीपासून औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली. तत्पूर्वी मागील दोन महिन्यांपासून कोरोना रूग्णांची रोजची संख्या ही केवळ ३० ते ४० रूग्णांच्या घरात होती. मात्र १५ फेब्रुवारीनंतर कोरोनाच्या रूग्णवाढीने घेतलेली उसळी चिंताजनक बनली आहे.
विशेष म्हणजे आता मागील पाच दिवसांपासून जिल्हयात रोज चारशेपेक्षा अधिक रूग्ण निघत असून त्यात शहरात रोजचे तिनशेपेक्षा अधिक रूग्ण आढळून येत आहेत. ग्रामीण भागातही कोरोना रूग्णांची संख्या अलीकडे वाढू लागली आहे. त्यामुळे ११ मार्चपासून अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. ही परिस्थिती पाहता सध्यस्थितीत पालिकेने कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे.
सात दिवसांत शहरात २१७१ रूग्ण
मागील सात दिवसांपासून जिल्ह्यात तिनशे ते चारशेपेक्षा अधिक रूग्ण आढळत आहेत. विशेष म्हणजे यात शहरातील रूग्णांचीच संख्या अधिक आहे. १ ते ७ मार्च दरम्यान जिल्ह्यात २६०३ रूग्ण आढळले असून त्यात २१७१ रूग्ण हे केवळ शहरातील आहेत. तर मागील पाच दिवसांत शहरात ३०७, ३०८, ३५३, ३७३, ३४८ याप्रमाणे रूग्ण आढळले आहेत. यावरूनच शहरात कोरोनाचा संसर्ग किती गतीने पसरतो आहे, याची प्रचिती येते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…तर अर्णब गोस्वामीप्रमाणे अनेकांना बेड्या पडतील, म्हणूनच भाजपचा आकांडतांडव ?’
- घाटीतील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही लवकरच : अमित देशमुख
- श्री नामदेव तीर्थक्षेत्र; अर्थमंत्र्यांची पोकळ घोषणा
- सरकारच्या ‘या’ प्लॅनमुळे सर्वसामन्यांसह शेतकऱ्यांना होणार फायदा
- ‘शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनविण्याचा सरकारचा प्रयत्न कौतुकास्पद’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

