औरंगाबाद : शहरातील पार्किंगच्या जागांवरील अतिक्रमणे हटवून त्या मोकळ्या करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. त्याचबरोबर शहरातील अनधिकृत बांधकामे देखील मनपाच्या रडारवर आहेत. ठिकठिकाणी मनपाच्या पथकांद्वारे कारवाईचा बडगा उचलणे सुरु आहे. आज (दि.९) शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयालगत असलेल्या दुष्यंत महल परिसरात अनधिकृत दोन मजली इमारत जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी मनपा अतिक्रमण हटाव पथकातील कर्मचारी उपस्थित होते.
शहरातील अनधिकृत इमारतींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्या तुलनेत कारवायांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शहरातील अनधिकृत इमारतींचा प्रश्न बिकट होत चालला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयालगत तसेच खा. इम्तियाझ जलील यांच्या कार्यालयामागे असलेल्या इमारतीवर आज हातोडा मारण्यात आला. जानेवारीपासून या इमारतीचे मालक असलेल्या मतीन खान, जिनर खान यांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.
मात्र त्यांनी याबाबत कुठलाही खुलासा न केल्यामुळे आज सदर इमारत मनपाद्वारे पाडण्यात आली. शहरातील अनेक भागात राजरोसपणे अतिक्रमण करणे सुरू आहे. अनेकांनी पार्किंगच्या जागा गिळंकृत करून त्याजागी छोटे-मोठे व्यवसाय हॉटेल धारक, चहा टपऱ्यांना त्या जागा भाड्याने दिल्या आहेत. आणि त्यांच्याकडून दिवसाचे ठरल्याप्रमाणे वसुली केली जाते.
मात्र यामुळे सदर दुकानात येणार्या ग्राहकांना पार्किंगसाठी जागा शोधावी लागते. मनपाने पार्किंग गिळंकृत केलेल्या अशा अनेक व्यावसायिक कॉम्प्लेक्सची यादी तयार केली आहे. मात्र ही कारवाई गेले काही दिवस थंडबस्त्यात गेलेली आहे. छोट्या-मोठ्या ठिकाणी असलेल्या चहाच्या टपर्या हातगाड्या यांच्यावर कारवाईचे सत्र सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनविण्याचा सरकारचा प्रयत्न कौतुकास्पद’
- महाविकास आघाडीकडून मराठवाड्यावर अन्याय-आ. मेघना बोर्डीकर
- सौदीच्या तेल विहिरींवर हल्ले, पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकणार
- अधिवेशन एक दिवसाने वाढवा; विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसचं ठरलंय !
- अमिताभ बच्चन यांनी केला मराठी चित्रपटाचा टीझर शेअर


