Share

पाचशे रुपयांवरून दोन पोलिसांत तुंबळ हाणामारी

Published On: 

औरंगाबाद : कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या सोयगाव पोलीस ठाण्याच्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये दुपारी भर उन्हात मद्यधुंद अवस्थेत पाचशे रूपयांच्या देवाण घेवाणीतून ठाण्यातच हाणामारी झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव येथे हा प्रकार घडला.

सोयगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी भूषण चौधरी व रोहन शिंदे यांच्यात पाचशे रुपयांच्या देवाण घेवाणीवरून सोयगाव बायपास रस्त्यावर कपडे काढून तुंबळ हाणामारी झाली. त्यानंतर त्यांची समजूत काढत सहकाऱ्याने त्यांना पोलीस ठाण्यात आणले. मात्र पोलीस ठाण्यात पुन्हा पोलीस कर्मचारी चौधरी व रोहन शिंदे या दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

या हाणामारीत भूषण चौधरी (३४, रा.शिवाजीनगर सिल्लोड) हे गंभीर जखमी झाले. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय सूत्रांनी (मेडिकल लीगल केस) न्याय वैद्यकीय तक्रार सोयगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. मात्र अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. शहरासह तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांच्या आर्थिक देवाण घेवाणीतून पोलिसात झालेल्या हाणामारीची चर्चा सध्या तालुक्यात रंगू लागली आहे. मात्र वरिष्ठ पातळीवरून काय कारवाई केली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सोयगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता, दोघांचे वैयक्तिक भांडण आहे. तरीही पोलिसांमध्ये झालेल्या मारहाणीबाबत चौकशी करून कार्यालयीन कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!