🕒 1 min read
मुंबई : महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अमिताभ बच्चन यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. त्यांना ‘नेमके किती दिवस रुग्णालयामध्ये ठेवणार’? या संदर्भात अभिषेक बच्चनने टि्वट करुन माहिती दिली आहे.
अभिषेक बच्चनने टि्वट केले आहे कि, “मी आणि माझे वडिल किती दिवस रुग्णालयात राहणार ते सर्व डॉक्टरांवर अवलंबून आहे. प्रत्येकाने सावधगिरी बाळगून काळजी घ्यावी, कृपाकरुन नियमांचे पालन करा”.
My father and I remain in hospital till the doctors decide otherwise. Everyone please remain cautious and safe. Please follow all rules!
— Abhishek ???????????????????????????????? (@juniorbachchan) July 12, 2020
दरम्यान , अमिताभ आणि यांचा मुलगा अभिषेक यानंतर सून ऐश्वर्या आणि नात आराध्या यांची कोरोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ऐश्वर्या आणि आराध्या मात्र घरीच होम क्वारंटाइनमध्ये राहणार आहेत. तर “अमिताभ बच्चन यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांच्या सौम्य लक्षणे आढळली आहेत. सध्या त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे”, असं नानावटी रुग्णालयाकडून माहिती मिळाली आहे.
अमिताभ-अभिषेक पाठोपाठ ऐश्वर्या-आराध्या यांनाही कोरोनाचा संसर्ग
अक्षय कुमारचा येणारा ‘हा’ चित्रपट आणखी लांबणीवर
बिग बींसाठी हेमा मालिनी यांनी केली प्रार्थना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

