🕒 1 min read
मुंबई –महानायक अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्या सौम्य लक्षणे आढळली असून नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. शनिवारी रात्री उशीरा बिग बींनी ट्विट करत करोना झाल्याची माहिती दिली. त्यानंतर चाहत्यांमध्ये आणि कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे.
कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडलेल्या महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर असल्याचं नानावटी रुग्णालयाने एका निवेदनात म्हटले आहे. अमिताभ बच्चन यांना कोरोना विषाणूची सौम्य लक्षणे आहेत आणि त्यांना रुग्णालयाच्या आइसोलेशन वार्डात ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर सतत नजर ठेऊन आहे.
बच्चन यांनी हॉस्पिटल प्रशासनाला सांगितले आहे की, माझ्या प्रकृतीबाबत सतत ट्विटरद्वारे माहिती देत रहा. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे की, अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची हल्की लक्षणे आहेत. तसेच सध्या दोघांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, अमिताभ, अभिषेक यांच्यापाठोपाठ अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अभिषेक-ऐश्वर्या यांची कन्या आराध्या बच्चन यांनाही संसर्ग झाला आहे. दोघींनाही नानावटी रुग्णालयात नेले जाण्याची शक्यता आहे.बिग बी यांच्या पत्नी, अभिनेत्री जया बच्चन, त्यांची कन्या श्वेता बच्चन-नंदा, नात नव्यानवेली नंदा, नातू अगस्त्य नंदाही यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
‘पुढून, मागून कसंही पाहिलं तरी गडी पैलवान काय वाटतं नाही’
परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ, आता तरी HRD आणि युजीसीला पटेल का?
सरकारने नाही तर RSS च्या स्वयंसेवकांनी धारावीत जीव धोक्यात घातला होता – चंद्रकांत पाटील
‘फडणवीस फिल्डवर काम करत असल्याने जनता कौतुक करित आहे त्यामुळे आदित्य ठाकरेंना पोटशूळ उठले’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

