मुंबई : गेल्या ३ महिन्यांपासून कोरोनाने राज्याला विळखा घातला आहे. आता कुठे सुरु असलेला लॉकडोउन थोडा शिथिल करण्याचा प्रयत्न होत आहे. अनलॉकडाऊनमध्ये प्रत्येक क्षेत्र हळूहळू खुले होत असून तब्बल अडीच लाख लोकांचा कोरोना विमा उतरवून मनोरंजन क्षेत्रानेही पुन:श्च हरिओम केले आहे. नियमांचे पालन करत टीव्ही मालिका आणि सिनेमांची शूटिंग सुरू झाली आहे. मात्र बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ सिनेमाचं शूटिंग नोव्हेंबरमध्ये सुरु करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
अक्षयचा हा चित्रपट पीरियड ड्रामा चित्रपट आहे, ज्याच्या वॉर सीक्वेन्समध्ये एका जागेवर शेकडो लोकांना एकत्र यावे लागणार आहे. आणि जास्त गर्दीच्या चित्रपटांची शूटिंग सध्यातरी लवकर सुरु होणार नाहीय. चित्रपटाचे निर्माता आदित्य चोप्रा आणि दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी या चित्रपटासोबत कोणतीही तडजोड करु इच्छित नाही. यासाठी त्यांनी या चित्रपटाची शूटिंग थोड्या उशिराने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. असे वृत्त लोकमतने दिले आहे.
या दरम्यान अक्षय कुमार म्हटला की, ‘मला वाटते की, आम्हाला सर्वांना अशाच प्रकारे आपले आयुष्य हळूहळू पुर्वरत असे सुरु करायला हवे. परिस्थिती खूपच बदललेली आहे मात्र काम तर करायचेच आहे. सर्वांनीच आपला परिसर स्वस्थ आणि सुरक्षित ठेवा आणि आपापले काम सुरु करा. मी स्वत: चार महिन्यानंतर शूटिंग सुरु करत आहे.’
अक्षय कुमार पुढील महिन्यात ब्रिटनमध्ये त्याचा ‘बेलबॉटम’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी जाणार आहे. तेथून परत भारतात आल्यानंतर अक्षय ‘पृथ्वीराज’च्या सेटवर दिसणार आहे. ‘पृथ्वीराज’ची सुमारे ४० दिवसांची शूटिंग बाकी आहे.
दरम्यान, लॉकडाउन नंतर सर्वप्रथम अक्षय कुमारनेच एका जाहिरातीच्या शूटिंगची सुरुवात केली होती. सिनेइंडस्ट्रीचे बाकी दिग्गज कलाकार जसे विद्या बालन, तापसी पन्नू आणि अर्जुन कपूर यांनीदेखील आपली सुरुवात केली आहे.
#DilSeThankYou : रात्रंदिवस काम करणार्या पोलिसांचे अक्षय कुमारने मानले अनोख्या पद्धतीने आभार
“यंदा गणेशोत्सव नव्हे तर आरोग्योत्सव”; लालबागचा राजाचा ऐतिहासिक निर्णय
अक्षय कुमारचा नाशिक दौरा वादात, भुजबळांनी दिले चौकशीचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

