Share

“बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला ठेच पोहचत असेल..” ; केंद्रीय मंत्र्यांची शिवसेनेवर टीका

Published On: 

पुणे : “महाराष्ट्रासारख्या राज्यात हनुमान चालिसा पठण, जय श्रीरामच्या घोषणा केल्या तर पोलिसांकडून अटक होत आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारची स्थिती पाहून स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला ठेच पोहचत असेल,” अशा कठोर शब्दात केंद्रीय अन्न व पुरवठा, पर्यावरण, हवामानबदल खात्याचे राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

उत्तर प्रदेशात योगी सरकारकडून अनियमित भोंगे उतरवले जात आहेत, त्याचे स्वागत केले पाहिजे. सकाळी आणि रात्री भोंग्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शासनाचे जे नियम आहेत, त्याचे काटेकोर पालन झाले पाहिजे. बिहार मध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राजदचे नेते तेजस्वी यादव इफ्तार पार्टीत एकमेकांना गळ्याला पडले असतील तर त्यात गैर नाही. वेगवेगळ्या धर्माच्या सणात एकमेकांनी उत्साहाने भेटण्यास योग्यच आहे. पण त्यातून बिहार मध्ये कोणतीही राजकीय उलथापालथ होणार नाही, तेथे ‘एनडीए’चे सरकार सत्तेत राहील, असेही अश्विनीकुमार चौबे यांनी सांगितले.

तसेच यावेळी त्यांनी महाराष्ट्राचा पश्चिम घाट याविषयी भाष्य केले. महाराष्ट्रातील जवळपास २० टक्के जमीन क्षेत्र हे वनांनी व्यापलेले आहे. गेल्या तीन वर्षात वन्यप्राणी तसेच माणसांवरही हल्ले झाले आहेत. असे संघर्ष होऊ नयेत म्हणून, अशा घटना टाळण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे. पश्चिम घाटातील वन वैभव टिकावण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहोत, असे अश्विनीकुमार चौबे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!