Share

“त्यांच्या गुळगुळित मेंदुवर सुरकुत्या पडून…”, चित्रा वाघ यांच्या टीकेवर शिवसेनेचे प्रत्युत्तर!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काल (२९ एप्रिल) शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. यावर उत्तर देत भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. दरम्यान, चित्रा वाघ यांच्या टीकेवर आता मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्य शीतल शेठ-देवरूखकर (Sheetal Sheth-Devrukhkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

यासंदर्भात शीतल यांनी ट्विट केले असून ते म्हणाले आहेत की,‘सातत्याने अत्यंत बावळट व बुरसटलेल्या विचारांचे ट्विट करणाऱ्या चित्रा वाघ ताईंना कोणत्याही पक्षाने ‘मनसे’स्वीकारलेले नाही. त्यामुळे त्या एक राजकीय टिश्यु पेपर झाल्या आहेत. ‘ तसेच त्यांच्या गुळगुळित मेंदुवर सुरकुत्या पडून त्यांना सद्बुध्दी मिळो, अशी घणाघाती टीका शीतल यांनी केली आहे.

दरम्यान, ‘भाजप मनसेवर तुटून पडा सगळ्यांना सडेतोड उत्तर द्या, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. म्हणजे तुम्ही तुटून पडा मी घरातुन बुळबुळीत टोमणे मारेन’, अशी टीका चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर केली होती.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!