Share

IPL 2022 RR vs MI : फक्त तुझ्यासाठी शेन वॉर्न..! आज राजस्थान रॉयल्स करणार ‘ही’ गोष्ट; मुंबईचे खेळाडूही पाहत राहणार!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स (RR vs MI) आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा संघ त्यांचा दिवंगत माजी कर्णधार शेन वॉर्नच्या स्मरणार्थ खास जर्सी घालणार आहे. राजस्थानचे खेळाडू खास जर्सी घालून आपल्या माजी कर्णधाराला श्रद्धांजली वाहतील.

जगातील दिग्गज फलंदाजांना आपल्या फिरकीवर नाचवणारा महान गोलंदाज शेन वॉर्नचे गेल्या महिन्यात निधन झाले. शेन वॉर्नला वयाच्या ५२व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला. पहिल्या आयपीएल हंगामात वॉर्न राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार होता आणि त्याने त्याच्या नेतृत्वाखाली संघाला विजेतेपदही मिळवून दिले.

https://twitter.com/rajasthanroyals/status/1520244046857342978/photo/1

राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीने शुक्रवारी सांगितले, की शेन वॉर्नच्या स्मरणार्थ संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध ‘SW23’ जर्सी परिधान करेल. संघाच्या ट्विटर हँडलवर जर्सीचे फोटोही शेअर करण्यात आले आहेत. राजस्थान रॉयल्सने कॅप्शनमध्ये लिहिले, ”विशेष व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी विशेष जर्सी.”

शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहण्यासाठी त्याचा भाऊ जेसनही स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहे. त्याला राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीने त्याला आमंत्रित केले होते. डी. वाय. पाटील स्टेडियमवर शेन वॉर्न ट्रिब्युट गॅलरीही बांधण्यात आली आहे. सर्व चाहते या गॅलरीत जाऊ शकतील. वॉर्न हा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा पहिला कर्णधार आहे. २००८ मध्ये जेव्हा आयपीएल सुरू झाले तेव्हा शेन वॉर्न वयाच्या ३७व्या वर्षी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार झाला. त्याने आपल्या नेतृत्वाखाली राजस्थानला या मोसमात चॅम्पियन बनवले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!