Share

आकाश चोप्रानं केलं ‘मोठं’ वक्तव्य; भारताच्या ‘या’ खेळाडूला म्हटलं जगातील सर्वोत्तम टी-२० लेगस्पिनर!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा (aakash chopra) याने लेग स्पिनच्या बाबतीत युझवेंद्र चहल याला जगातील सर्वोत्कृष्ट टी-२० फिरकी गोलंदाज असे म्हटले आहे. आकाश चोप्राच्या मते, चहल हा खूप चांगला गोलंदाज आहे आणि तो इतरांपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने गोलंदाजी करतो. चहलची टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली नाही. त्याला संघातून वगळण्यात आले पण त्यानंतर चहलने आयपीएल २०२२मध्ये जबरदस्त कामगिरी केली.

चहल आयपीएल २०२२ लीगमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता आणि त्याने पर्पल कॅप जिंकली. चहलने आयपीएल २०२२मध्ये एकूण २७ विकेट घेतल्या आणि हॅट्ट्रिकही घेतली. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठीही त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.

आकाश चोप्रा म्हणाला, ”युझवेंद्र चहल हा उत्तम गोलंदाज आहे. तो इतर गोलंदाजांपेक्षा खूप वेगळी गोलंदाजी करतो. सामान्यतः सर्व लेग स्पिनर टी-२० क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत परंतु बहुतेक गोलंदाज गुगली आणि लेग स्पिनचा वापर फारच कमी करतात. याशिवाय ते चेंडू यष्टीच्या मध्यभागीही ठेवत नाहीत. चहलने आपली लाईन अशा प्रकारे बदलली की तुम्हाला तो ग्रँडमास्टर वाटतो. लेग स्पिनरसाठी, त्याचा चेंडू हवेत राहणे आवश्यक आहे, त्यानंतर थोडासा डीप करून नंतर वळणे आवश्यक आहे.”

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!