मुंबई : भारतीय क्रिकेट संघासोबत ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यावर आहे. या ५ सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ९ जून ला दिल्लीत खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या तयारीत करत असलेल्या पाहुण्या संघाच्या कर्णधाराने भारतीय युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकबद्दल भाष्य केले आहे. उत्तर देताना तो म्हणाला की, ‘इतक्या वेगवान चेंडूला सामोरे जाणे कोणालाही आवडणार नाही.’
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बावूमा म्हणाला, “गोलंदाजीच्या बाबतीत तो भारतीय क्रिकेटसाठी अतिशय प्रतिभाशाली खेळाडू आहे. मी हे मान्य करतो की, १५० किमी प्रतितास वेग असलेल्या गोलंदाजाचा सामना कोणत्याही फलंदाजाला करावासा वाटत नाही. उमरान त्याच वेगाने गोलंदाजी करत आहे आणि इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात या हंगामात भारतीय गोलंदाजाने सर्वात जलद चेंडू टाकण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.”
“उमरानला भारतीय संघासाठी गोलंदाजीच्या बाबतीत खूप चांगली संधी आहे. भारतीय संघासाठी आयपीएल फायद्याचे ठरले आहे. त्यांना ते सर्व वेगवान गोलंदाज शोधता आले आहेत. आम्ही निश्चितपणे दक्षिण आफ्रिकेत वेगवान गोलंदाजी खेळून मोठे झालो आहोत. पण कोणत्याही फलंदाजाला १५० किमी प्रतितास वेगाने चेंडूचा सामना करायचा आहे असे वाटत नाही, परंतु आम्ही जमेल तशी तयारी करत आहोत.”
बावुमा म्हणाला, “आमच्याकडे १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकणारे गोलंदाजही आहेत. त्यामुळे आमच्याकडेही अशी शस्त्रे आमच्या खजिन्यात आहेत. तरीही, मला सांगायचे आहे की उमरान मलिक हा भारतीय संघाचा एक विशेष प्रतिभाशाली खेळाडू आहे. मला वाटत आहे की तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही आयपीएलमधील कामगिरी कायम ठेवू शकेल.”
महत्वाच्या बातम्या:


