मुंबई : नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणारा भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील पहिला टी-२० सामना हाऊसफुल्ल होणार आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (DDCA) च्या म्हणण्यानुसार, या सामन्याची ९४ टक्के तिकिटे आधीच विकली गेली आहेत आणि फक्त काही तिकिटे शिल्लक आहेत. दिल्लीत दीर्घकाळानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. या मैदानावर शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर २०१९मध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारत-बांगलादेश आमनेसामने आले होते.
या सामन्यानंतर दिल्लीत आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे या सामन्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. त्याच वेळी, या टी-२० मालिकेत कोणताही बायो-बबल असणार नाही. त्यामुळे खेळाडूंना मोठा दिलासा मिळणार आहे. दोन वर्षांतील ही पहिली आंतरराष्ट्रीय मालिका असेल ज्यामध्ये बायो-बबल नसेल.
या सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे तिकीटांची विक्री व्हायला वेळ लागला नाही. डीडीसीएचे सहसचिव राजन मनचंदा यांनी पीटीआयला सांगितले, की ९४ टक्के तिकिटे आधीच विकली गेली आहेत. फक्त ४००-५०० तिकिटे उरली आहेत. सुमारे २७,००० तिकिटे विक्रीसाठी ठेवण्यात आली होती.
भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
- पहिली टी-२० – ९ जून, अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
- दुसरी टी-२० – १२ जून, बाराबती स्टेडियम, कटक
- तिसरी टी-२० – १४ जून, VDCA क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम
- चौथी टी-२० – १७ जून, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट
- पाचवी टी-२० – १९ जून, एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू
महत्त्वाच्या बातम्या –

