Share

“युवराज सिंग भारताचा महान कॅप्टन झाला असता”, वाचा हरभजन सिंगनं का म्हटलं असं?

Published On: 

मुंबई : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग (Yuvraj Singh) याने महिन्याभरापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार होण्यासाठी आपण कसे तयार होतो, याविषयी विधान केले होते, परंतु ग्रेग चॅपल वादात सहकाऱ्यांना पाठिंबा दिल्यामुळे तो कर्णधार होण्यास मुकला होता. युवराजचा संघसहकारी असलेल्या हरभजन सिंगने चॅपल वादाबद्दल सांगण्यास नकार दिला. युवराज कर्णधार होण्याच्या शक्यतेवर भज्जीने विचार केला आणि तो भारतासाठी एक महान कर्णधार का ठरला असता, हे स्पष्ट केले.

युवराज सिंगची क्रिकेट कारकीर्द खूप उज्ज्वल होती. दोन वेळा भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाचा तो भाग होता. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २००७ मध्ये टी-२० विश्वचषक आणि २०११ मध्ये ५० षटकांचा विश्वचषक जिंकला होता. २०११ क्रिकेट विश्वचषकात केलेल्या कामगिरीबद्दल युवराजला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’चा किताब देण्यात आला.

हरभजन सिंग म्हणाला, ”जर युवराज सिंग भारताचा कर्णधार असता तर आम्हाला लवकर झोपावे लागले असते आणि लवकर उठावे लागले असते. आम्हाला खूप मेहनत करावी लागली. तो उत्तम कर्णधार झाला असता. युवराज सिंग कर्णधार असता तर आमची कारकीर्द लांबली असती असे मला वाटत नाही. कारण खेळेपर्यंत आम्ही स्वबळावर खेळलो. कोणत्याही कर्णधाराने आम्हाला संघातून वगळण्यापासून वाचवले नाही. जेव्हा तुम्ही देशाचे नेतृत्व करता तेव्हा तुम्हाला मैत्री बाजूला ठेवून आधी देशाचा विचार करावा लागतो.”

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!