🕒 1 min read
मुंबई : माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनची (Playing XI) घोषणा केली आहे. यजमान भारत आणि पाहुण्या दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना ९ जून रोजी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल. या मालिकेत भारताने आपल्या वरिष्ठ खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिली आहे. या मालिकेअंतर्गत भारतीय संघ आगामी टी-२० विश्वचषकाची तयारी करणार आहे.
रवी शास्त्री यांनी अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आणि चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांना त्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळले आहे. शास्त्रींनी दिनेश कार्तिकच्या टीम इंडियात पुनरागमनाचे समर्थन केले असले तरी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि संघ व्यवस्थापनाला युवा प्रतिभेला जोपासायचे आहे.
“You need a keeper who will do MS Dhoni's role, let's put it that way. There is already Rishabh Pant who can bat in the top four or five in T20 cricket,” @RaviShastriOfc said. https://t.co/bZpT4yseto
— Circle of Cricket (@circleofcricket) June 5, 2022
शास्त्री म्हणाले, “टी-२०मध्ये चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकणारा ऋषभ पंत संघात आधीच आहे. पण तुम्हाला सामना पूर्ण करू शकेल असा कोणीतरी हवा आहे कारण धोनीच्या निवृत्तीनंतर फारसे फिनिशर नाहीत. त्यामुळे, मला वाटते की येथे त्याची संभावना खूप चांगली आहे.”
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यासाठी रवी शास्त्रींची प्लेइंग इलेव्हन :
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग/उमरान मलिक आणि हर्षल पटेल.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
