Share

ENG vs NZ : दसहजारी मनसबदार..! इंग्लंडच्या विजयाला जो रूटच्या ‘विक्रमी’ शतकाची साज

Published On: 

मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या (ENG vs NZ) पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात इंग्लंडचा फलंदाज जो रूट (Joe Root) याने नाबाद शतक झळकावले. त्याच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिला कसोटी सामना ५ गडी राखून जिंकला. या खेळीदरम्यान, रूटने कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या आणि क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये सर्वात कमी वेळेत हा पराक्रम करण्याचा मान मिळवला.

जो रूटने आपल्या कसोटी क्रिकेटमधील ११८व्या सामन्यात १०,००० धावांचा टप्पा गाठला. १०,००० धावा पूर्ण करण्यासाठी त्याला ९ वर्षे आणि १५६ दिवस लागले आणि सर्वात कमी वेळेत कसोटी क्रिकेटमध्ये हा आकडा गाठणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. रुटने अॅलिस्टर कूकचा विक्रम मोडला, जो त्याच्या आधी सर्वात कमी वेळेत १०,००० धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज होता. कूकने १० वर्षे ८७ दिवसांत हा पराक्रम केला. त्याचवेळी, या प्रकरणात भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविड तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने ११ वर्षे २८० दिवसांत कसोटीत १०,००० धावा केल्या.

इंग्लंडने जिंकलेल्या कसोटी सामन्यात सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत जो रूट आता पहिल्या स्थानावर आहे. रुटने शतक झळकावण्याची ही १८वी वेळ होती आणि इंग्लंडने विजय मिळवला. त्याचबरोबर याआधी हा विक्रम अॅलिस्टर कूकच्या नावावर होता. कूकने आपल्या कसोटी कारकिर्दीत इंग्लंडसाठी जिंकलेल्या सामन्यांमध्ये १७ कसोटी शतके झळकावली होती. त्याचबरोबर इयान बेल १५ शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!