🕒 1 min read
नागपूर : राज्यातील मंत्री आमदारांकडे टक्केवारी मागतात, असा गंभीर आरोप आमदार आशिष जयस्वाल यांनी केला आहे. टक्केवारी मागणाऱ्या मंत्र्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे जयस्वाल यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीला पाठिंबा देणारा पहिला आमादर मी आहे. परंतु मतदार संघातील प्रश्न महत्वाचे आहेत. मात्र काही मंत्री टक्केवारी मागतात, असा आरोप त्यांनी केला आहे.
आमदार आशिष जयस्वाल म्हणाले, “निधीचा असमतोल आम्ही सहन करणार नाही. आमच्या मतदार संघावर आम्ही कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. अनेक मंत्री आमदारांना किंमत देत नाहीत. ते मंत्री मतदार संघातील कामातून देखील पैश्यांची अपेक्षा करतात. मंत्र्यांना आर्थिक मोबदला दिल्यानंतरच काही मंत्री निधी देतात. वेगवेगळ्या पद्धतीने ते निधी घेण्याचा ते प्रयत्न करतात. ही बाब मी मुख्यमंत्र्याच्या लक्षात आणून देणार आहे.”
आशिष जयस्वाल यांच्या आरोपानंतर भाजप नेते ठाकरे सरकारवर टीका करत आहेत. “सचिन वाजे १०० कोटी नंतर आता मंत्री थेट आमदारांनाच टक्केवारी मागू लागले आहेत. टक्केवारी, खंडणी हाच या महाविकास आघाडी सरकारचा खरा चेहरा आहे”, अशी टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
