🕒 1 min read
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीचा आज वाढदिवस आहे. सौरव गांगुली आज त्याचा ५०वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याच्या सहकारी खेळाडूंसह त्याचे चाहतेही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनेही सौरव गांगुलीचे खास अभिनंदन केले आहे.
युवराज सिंगने सौरव गांगुलीसोबतचे काही फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. यात तो म्हणाला, ”वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा. तू एक चांगला मित्र आहेस, प्रभावशाली कर्णधार आहेस आणि एक वरिष्ठ आहेस ज्याच्याकडून प्रत्येक तरुण शिकू इच्छितो. आपण नेहमी निरोगी आणि आनंदी राहावे अशी माझी इच्छा आहे. खूप प्रेम आणि शुभेच्छा.”
Happy Birthday Dada! You’ve been a great friend, an impactful captain and a senior any youngster would want to learn from.
Wishing you good health and happiness on your special day ???? lots of love and best wishes always @SGanguly99 #HappyBirthdayDada pic.twitter.com/SPEIVIXJcA
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) July 8, 2022
युवराज सिंगशिवाय मोहम्मद कैफनेही गांगुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याने लिहिले, ”गांगुली एक महान कर्णधार आणि उत्कृष्ट फलंदाज होता आणि आता तो भारतीय क्रिकेटचा प्रमुख आहे. मी माझ्या आवडत्या कर्णधार आणि मार्गदर्शकाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.”
आपल्या कर्णधारपदाच्या काळात सौरव गांगुलीने भारतीय संघातील अनेक खेळाडूंना संधी देऊन त्यांना घडवण्याचे काम केले. दादाच्या कर्णधारपदाखाली खेळलेले खेळाडू नेहमीच त्याच्या पाठीशी उभे राहिले. दादानेच भारतीय संघाला परदेशात जिंकायला शिकवले.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
