मुंबई : काळाबरोबर क्रिकेटमध्येही बदल होत आहेत. तंत्रज्ञानाने हा खेळ पाहण्याची आणि प्रदर्शित करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. असाच एक बदल इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-२० ब्लास्ट (T20 Blast 2022) मध्येही पाहायला मिळाला. सरे आणि यॉर्कशायर यांच्यातील टी-२० ब्लास्टच्या पहिल्या क्वार्टर फायनलचा चेंडू कारमधून मैदानात आणण्यात आला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते की कारच्या छतावर एक बॉल ठेवण्यात आला आहे आणि एक व्यक्ती रिमोट कंट्रोलने ही कार चालवत आहे. अचानक ही कार मैदानात पोहोचते. मैदानाच्या मधोमध छोटी कार पाहून खेळाडूही दंग झाले आहेत. सामान्यत: सामना सुरू होण्यापूर्वी चेंडू अंपायरच्या हातात असतो. पण, टी-२० ब्लास्टमध्ये मैदानावर चेंडू मिळवण्याचा अनोखा मार्ग अवलंबला गेला. यॉर्कशायर आणि सरे यांच्यात खेळला गेलेला पहिला उपांत्यपूर्व सामना अतिशय रोमांचक झाला. सरेला विजयासाठी शेवटच्या ६ चेंडूत ५ धावांची गरज होती. पण, यॉर्कशायरने हा सामना एका धावाने जिंकून उपांत्य फेरीत धडक मारली.
???? @Vitality_UK bringing out the match ball in style ???? pic.twitter.com/rks0SBXabZ
— Vitality Blast (@VitalityBlast) July 6, 2022
प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड विलीच्या नेतृत्वाखाली यॉर्कशायर संघाने २० षटकांत ५ गडी गमावून १६० धावा केल्या. यॉर्कशायरकडून टॉम कोहलरने ६२ धावा केल्या. सरेसाठी गस ऍटकिन्सनने २ बळी घेतले.
१६१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सरेचा संपूर्ण संघ ७ गडी गमावून १५९ धावाच करू शकला सरेकडून टॉम करनने ३६ आणि लॉरी इव्हान्सने नाबाद ३५ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

