मुंबई : अभिनेत्री नीतू कपूर यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने सोशल मीडियावरून अनेक कलाकारांनी नीतू कपूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्येच नीतू कपूर यांची सून आलिया भट्ट हिने देखील एक खास फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आलियाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर दोघींचा एक फोटो शेअर केला. आणि लिहिले की, ,”सर्वात सुंदर मनाच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझी सासू, मैत्रीण आणि लवकरच होणाऱ्या आजीला खूप सारं प्रेम”.

आलियाने तिच्या हळदी समारंभातील एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आलिया आणि नीतू कपूर दोघींनी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याचं दिसत आहे. आलियाच्या गालाला हळद लागली आहे. तर नीतू कपूर यांच्या हातात मिठाईची थाळी असून आलियाच्या कपाळाचं चुंबन घेताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या :


