Share

Kalyan Dombivali : कल्याण डोंबिवलीत शिवसेनेला मोठा झटका; तब्बल ५५ नगरसेवकांच शिंदे गटाला समर्थन

Published On: 

🕒 1 min read

कल्याण डोंबिवली : काल ठाणे महापालिकेतील ६७ पैकी ६६ शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईतील तब्बल ३० शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. असं असतानाच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना आता मोठा फटका बसला आहे. नवी मुंबई, ठाण्यातील नगरसेवकांनी एकमताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्यानंतर कल्याण डोंबिवलीतील नगरसेवकांनी देखील शिंदेंना समर्थन दिल आहे.

कल्याण डोंबिवलीतील नगरसेवकांनीही काल रात्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना समर्थन दिले. यामध्ये सुमारे ५५ नगरसेवक आणि शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. या सर्व नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

दरम्यान, दुसरीकडे आदित्य ठाकरे मुंबईसह राज्यभरात ‘निष्ठा यात्रा’ काढणार आहेत. या यात्रेद्वारे आदित्य ठाकरे बंडखोरांच्या मतदार संघात शक्तीप्रदर्शन करणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या या यात्रेला 8 जुलैपासून अर्थातच आजपासून सुरुवात होणार आहे. यात आदित्य ठाकरे गटप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटून शक्तिप्रदर्शन करतील. याद्वारे शिवसेना पुनर्बांधनीस सुरुवात केली जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!