Share

ऐकूण व्हाल थक्क! गुजरातची मुलगी करणार स्वतःशीच लग्न

Published On: 

गुजरात :  लग्नाविषयी सर्वांचे वेगवेगळे विचार असतात. लग्नासंबंधी सगळ्यांच्याच  विशिष्ट इच्छा आकांक्षा असतात. २४ वर्षांची क्षमा ही सुद्धा आपल्या लग्नाच्या तयारीला लागली आहे. ११ जूनला क्षमाचं लग्न आहे. क्षमाने लग्नासाठी लेहेंगा पासून, पार्लर आणि मेहंदीची तयारीही केली आहे. परंतु तिच्या लग्नाची एक खास गोष्ट म्हणजे तिच्या लग्नात नवरदेव नाही. हे एकूण तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित झाला असाल की, नवरदेवा शिवाय हे लग्न कसं आहे?

का घेतला असेल स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय?

एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, “मला कधीच लग्न करायचे नव्हते पण मला वधु बनायचे स्वप्न होते. त्यामुळे मी स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला”. दरम्यान क्षमाने ऑनलाईन पाहिले कोणत्या महिलेने स्वतःशी लग्न केले आहे का? पण तिला कोणीही सापडले नाही. स्वतःशीच लग्न करणारी देशातील ती पहिली महिला असू शकते.

ती एका खासगी कंपनी मध्ये काम करते. “स्वतःशीच लग्न करणे ही स्वतःशी असलेली बांधिलकी आहे”. असे देखील ती म्हणाली. “लोक त्यांच्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करतात मी स्वतःवरच प्रेम करते म्हणून स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि मी हनिमूनला देखील जाणार आहे”. हे देखील क्षमा म्हटली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!