बीड : शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी भाजप बरोबरची आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यात भाजपसोबत मात्र बीड जिल्ह्यात भाजपबरोबर नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा विनायक मेटे आणि भाजपमधील संघर्ष पाहायला मिळणार आहे. विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटना भाजपचा घटक पक्ष म्हणून आहे.
राज्यात विनायक मेटे भाजप बरोबर असले तरी बीड जिल्ह्यात त्यांनी भाजपबरोबर काडीमोड घेतला आहे. मेटे यांच्या या भूमिकेमुळे यापूर्वी देखील भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यातील संघर्ष दिसून आला होता. आता विनायक मेटे यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केल्याने, बीड जिल्ह्यात भाजप विरुद्ध शिवसंग्राम असा सामना रंगणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

