🕒 1 min read
Aditya Thackeray । मुंबई : गेल्या महिन्यात राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ५० आमदार घेऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडले. पुढे त्यांनी भाजपशी हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केलं. मात्र या सर्व घडामोडी घडताना मागील काही दिवसांत शिवसेना पक्ष चांगलाच अडचणीत सापडला आहे. आमदारानंतर आता १२ खासदारांनी देखील एकनाथ शिंदे यांना समर्थन दर्शवल आहे. तर दुसरीकडे विस्कळीत झालेल्या पक्षाची पुन्हा मोट बांधण्यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यभर निष्ठा यात्रा काढण्यास सुरवात केली आहे.
याच पार्श्वभूमीवर आज भिवंडीत शिवसेनेच्या एका मेळाव्याला संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर टीका केली. त्यांनी बंड केलं नाही. उठाव केला नाही. तर गद्दारी केली आहे, असं सांगतानाच शिवसेनेतून जे गेले ते गद्दारच आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच लाज असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवा, असं आव्हान देतानाच हे सरकार जास्त काळ चालणार नाही. दोन लोकांचं मंत्रिमंडळ आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे. ते कोसळणार म्हणजे कोसळणारच. हे लिहून घ्या, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
दरम्यान, काल देखील आदित्य ठाकरेंनी आग्रीपाडा येथील शिवसेना शाखा क्रमांक २१२ ला भेट दिली होती. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधताना बंडखोर आमदारांवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं. उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, गद्दार हे गद्दारच असतात. त्यांचं नाव कितीही बदललं, त्यांनी कितीही गट बदलले तरी गद्दारीचा शिक्का त्यांच्या माथ्यावरून पुसला जाणार नाही, असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Viral Video : पॅडशिवाय बॅटिंग करायला मैदानात पोहचला बॅट्समन, नंतर घडली ‘अशी’ घटना; पाहा VIDEO!
- Aaditya Thackeray: ज्यांना खावून खावून अपचन झालं त्यांनी गद्दारी केली – आदित्य ठाकरे
- Breaking News : मोठी बातमी! गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधमुक्त होणार; शिंदे सरकारचा निर्णय
- IND vs WI : पहिल्या सामन्यात शिखर धवनसोबत ‘या’ खेळाडूने द्यावी सलामी; वसीम जाफरचा सल्ला!
- Aaditya Thackeray : “गद्दार ते गद्दारच, त्यांच्या माथ्यावरून गद्दारीचा शिक्का…”; आदित्य ठाकरे आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
