ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत सेनेचे 40 आमदार फोडले. त्यानंतर अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. या धक्क्यातून कोलमडलेली शिवसेना आता सावरण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेनेची मोट नव्याने बांधण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हे आज शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने ठाण्यातील भिवंडी येथे आले होते. तेव्हा त्यांनी शिवसैनिकांशी आणि नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर पुन्हा एकदा निशाणा साधला. “शिवसेनेचे बंडखोर नेते असं म्हणताना दिसत आहेत की, त्यांनी उठाव केला होता, बंड केला होता. पण हा बंड नसून गद्दारी होती आणि ते आयुष्यभर गद्दारीचा शिक्का माथ्यावर घेऊनच फिरणार आहेत”, अशी आक्रमक टीका त्यांनी केली. तसेच जे गेलेत त्यांच्या अंगात, रक्तात शिवसेना कधीच नव्हती. शिवसेना असती तर ते हिंमतीने उभे राहिले असते, असे देखील ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- County Cricket : चेतेश्वर पुजाराच्या द्विशतकावर इंग्लंड फिदा, केलं भव्य स्वागत; पाहा VIDEO!
- Raj Thakrey : राज ठाकरेंची विचारपूस करण्यासाठी गायिका आशाताई ‘शिवतीर्थ’ वर
- Vijay devarkonda | विजय देवरकोंडाच्या ‘लिगर’कडून चाहत्यांना आहे ‘ही’ अपेक्षा; लवकरच होणार रिलीज
- Rupali Patil : चित्रा वाघ यांचं डोके ठिकाणावर आहे का ?; रुपाली पाटलांचा संतप्त सवाल
- Chitra Wagh | मला घाण भाषेत बोललं जात आहे, मेसेज केले जात आहेत – चित्रा वाघ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

