Share

IND vs WI : पहिल्या सामन्यात शिखर धवनसोबत ‘या’ खेळाडूने द्यावी सलामी; वसीम जाफरचा सल्ला!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माला वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. रोहितच्या जागी शिखर धवन संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा नसेल, अशा स्थितीत संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी शिखर धवनवर असणार आहे. रोहितच्या अनुपस्थितीत सलामीला कोण येणार या प्रश्नाचे उत्तरही अनेक जण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. एकदिवसीय मालिकेत धवनशिवाय भारतीय संघात रुतुराज गायकवाड, शुभमन गिल आणि ईशान किशन हे सलामीवीर आहेत. पण धवनसोबत डावाची सलामी कोण करणार हे महत्त्वाचे आहे.

शिखर धवन आणि रुतुराज गायकवाड सलामीला

भारताचा माजी कसोटीपटू वसीम जाफरने भारताच्या सलामी जोडीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. शिखर धवनसोबत वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडेत सलामीसाठी कोणता फलंदाज सर्वोत्तम ठरेल याबाबत जाफरने एक ट्विट केले आहे. निकोलस पूरनच्या नेतृत्वातील वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका भारताला खेळायची आहे. या मालिकेसाठी चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज रुतुराज गायकवाडला शिखर धवनसोबत सलामीला पाठवावे, असे जाफरने म्हटले आहे. गायकवाडने शुबमन गिल किंवा इशान किशनला मात देत ​​धवनसोबत सलामी करावी, असे वसीम जाफरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून म्हटले आहे.

जाफरने ट्विट करून लिहिले की, ‘मला वाटते की ऋतुराजने वनडेमध्ये पदार्पण करावे, आणि शिखरसोबत वेस्ट इंडिज मालिकेत सलामी करावी. विजय हजारे ट्रॉफीमध्ये रुतुराजने ५ डावात ४ शतके झळकावली आहेत. त्यासोबतच भारताचे डावे-उजवे संयोजनही कायम राहील.’ आयपीएल २०२२ मध्ये आपल्या संघासाठी दमदार कामगिरी केल्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या भारतीय टी-२० संघात ऋतुराज गायकवाडचा समावेश करण्यात आला होता. तो आतापर्यंत भारतासाठी एकही वनडे सामना खेळलेला नाही.

वेस्ट इंडीज विरुद्ध एकदिवसीय संघ

भारत : शिखर धवन (कर्णधार) ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध्द कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग

वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक

पहिला एकदिवसीय सामना – २२ जुलै – पोर्ट ऑफ स्पेन
दुसरा एकदिवसीय सामना – २४ जुलै – पोर्ट ऑफ स्पेन
तिसरा एकदिवसीय सामना – २७ जुलै – पोर्ट ऑफ स्पेन

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!