मुंबई : गेले दोन वर्षांपासून संपूर्ण जगावर कोरोना या महामारीच भयानक संकट सुरु होत. मात्र आता कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे. गेल्या २ वर्षांपासून सार्वजनिक सण-उत्सवांवर बंदी होती. कडक निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना सण-उत्सवांचा आनंद घेता येत नव्हता. पण आता या वर्षी गणेशोत्सव, दहीहंडी तसेच मोहर्रम हे सण धुमधडाक्यात साजरे करण्यात येणार आहेत. या वर्षी गणेश मूर्तीच्या उंचीवर कोणतीही मर्यादा नसेल. हा महत्वाच्या निर्णय शिंदे सरकार कडून घेण्यात आला आहे.
तसेच गणेश मंडळांना सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्या म्हणून एक खिडकी योजना राबवीली जाणार आहे. तशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच राज्यात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी एसटी प्रशासनाला जादा गाड्या सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहे. परिवहन विभागास वाहतूक नियोजनाचे आदेश देण्यात आले आहे. प्रमुख महामार्गांवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून महामार्ग पोलिसांनाही सूचना देण्यात आले आहे. या संदर्भात आज सह्याद्री राज्य अतिथीगृहात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हे निर्णय घेण्यात आले.
सह्याद्री राज्य अतिथीगृहात झालेल्या बैठकीत खालील निर्देश देण्यात आले.
● गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम या सणाच्या काळात राज्यातील कायदा व सुव्यवस्था उत्तम राहील या दृष्टीने पोलीस आणि जिल्हा प्रशासनांना निर्देश दिले आहेत.
● गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी राज्यभरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात यावेत.
● गणेशोत्सव मंडळांना कोणतेही नोंदणी शुल्क नाही. हमीपत्र भरून न घेण्याचे निर्देश दिले आहेत.
● गणेसोत्सव मंडळांना एक खिडकी योजनेतूनच सर्व प्रकारच्या परवानग्या मिळायला हव्यात.
● गणेशोत्सव हा सामाजिक भावनेतून साजरा केला जातो. नियम पाळले गेलेच पाहिजेत, मात्र नियमांचा अवास्तव बाऊ केला जाऊ नये.
● राज्यभर उत्सवासाठी एक नियमावली राहील. जिल्हा प्रशासनांनी उत्सवासाठी नोडल अधिकारी नियुक्त करावेत.
● मुंबईमध्ये बेस्टतर्फे सर्व विसर्जन ठिकाणं तसेच विसर्जन मार्गांवर पुरेशी वीज पुरवठ्याची व्यवस्था असावी.
● श्री गणेश मूर्तींच्या उंचीवरची बंधने उठवण्यात आलेली आहेत.
● मुंबईत मूर्तीकारांसाठी व मूर्तींशाळांसाठी जागा निश्चित करण्यात याव्यात. मूर्तीकारांसाठी असलेल्या काही जाचक अटी व शर्ती शिथील कराव्यात.
● पीओपीच्या मूर्तींबाबत एक तांत्रिक समिती नियुक्त केली जाणार असून, त्यामध्ये एमपीसीबी, निरी, आयआयटी, एनसीएल आदी संस्थांचे तज्ज्ञ प्रतिनिधी असतील. ही समिती पर्यावरणपूरक मार्ग काढेल.
● गणेशोत्सव कार्यकर्त्यांसाठी पूरस्कार योजना सुरु करण्यात येईल.
● धर्मादाय आयुक्तांनी मंडळ नोंदणीसाठी ऑनलाईन व्यवस्था असावी.
● गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवरील ध्वनी प्रदूषण तसेच इतर काही लहान गुन्हे नोंदवले गेले असतील, ते व्यवस्थित तपासून काढून टाकण्यासंदर्भात पोलिसांनी कार्यवाही करावी.
● दहीहंडीच्या उत्सवात लहान गोविंदाबाबत (१४ वर्षांच्या आतील) न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे.
महत्वाच्या बातम्या :
- IND vs ZIM : विराट कोहलीला फॉर्ममध्ये परतण्यासाठी बीसीसीआय घेऊ शकते ‘हा’ मोठा निर्णय; वाचा!
- Aarey Car Shed : आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामावरील स्थगिती उठवली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना धक्का!
- County Cricket : चेतेश्वर पुजाराचा इंग्लंडमध्ये डंका, ३ द्विशतकं झळकावून मोडला ११८ वर्षांचा विक्रम
- Shiv Sena | शिवसेनेच्या अखंडतेसाठी प्रती दादा कोंडके ‘उत्तम शिंदें’ची पायी वारी
- Aaditya Thackeray : थोडी जरी लाज उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या – आदित्य ठाकरे


