Share

Viral Video : पॅडशिवाय बॅटिंग करायला मैदानात पोहचला बॅट्समन, नंतर घडली ‘अशी’ घटना; पाहा VIDEO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्याचं म्हटलं जातं. कोणत्या क्षणी कोणती घटना घडेल हे कोणीही सांगू शकत नाही. एक काळ असा होता जेव्हा कॅरेबियन वेगवान गोलंदाजांसमोर खेळायला संपूर्ण जग घाबरायचे. परिस्थिती अशी होती की फलंदाजी करण्यासाठी कॅरेबियन गोलंदाजांसमोर फलंदाज थरथर कापायचे. मात्र हळूहळू या खेळातील सुरक्षा उपकरणे वाढल्याने खेळाडूंमधील भीती संपुष्टात आली. वेगवान चेंडूंवरही मोठे फटके मारण्यास खेळाडू आता मागेपुढे पाहत नाहीत. सध्या पॅड, हेल्मेट, हातमोजे ही उपकरणे खेळाडूचे संरक्षणात्मक उपकरण आहेत. पण कल्पना करा की जर एखादा फलंदाज या उपकरणांशिवाय फलंदाजीसाठी बाहेर पडला तर काय होईल?

नुकताच असाच एक विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. खरंतर इंग्लंडमध्ये व्हीलेज क्रिकेट सामना खेळला जात होता. यादरम्यान फलंदाजी करणाऱ्या संघाचा फलंदाज बाद झाल्यानंतर, एक नवीन खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात येतो. पण मैदानावर येताना तो चुकून पॅडशिवाय खेळायला येतो. जेव्हा फलंदाज खेळपट्टीवर स्टेन्स घेऊ लागतो तेव्हा त्याला विरोधी संघातील खेळाडूंकडून कळते की त्याने पॅड देखील घातलेले नाहीत. मग त्या खेळाडूला पुन्हा ड्रेसिंग रूममध्ये पळावे लागेल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपली चूक लक्षात आल्यानंतर ती व्यक्ती ड्रेसिंग रूमच्या दिशेने वेगाने पळत असल्याचे दिसून येते. दरम्यान, वाढलेल्या वजनामुळे त्याला वेगाने धावता येत नाही. त्याचवेळी मैदानात उपस्थित असलेले इतर खेळाडू आणि पंच हे दृश्य पाहून हसताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!