मुंबई : आयपीएल २०२२मधील साखळी सामने संपल्यानंतर आता महिला टी-२० चॅलेंज स्पर्धा (Women’s T20 Challenge 2022) होत आहे. आज पहिला सामना ट्रेलब्लेझर्स आणि सुपरनोव्हास यांच्यात रंगत आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात सुपरनोव्हासची कप्तान हरमनप्रीत कौरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ट्रेलब्लेझर्सचे नेतृत्व स्मृती मानधना करत आहे. २०२० मध्ये, सुपरनोव्हास संघ अंतिम सामन्यात ट्रेलब्लेझर्सकडून पराभूत झाला. त्याचा बदला घेण्याचा हेतू सुपरनोव्हास संघाचा असेल. कोरोना व्हायरसमुळे गेल्या वर्षी ही स्पर्धा झाली नव्हती. यावर्षी पुन्हा त्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वेलॉसिटी हा लीगमधील तिसरा संघ आहे.
ट्रेलब्लेझर्समध्ये मंधाना व्यतिरिक्त जेमिमा रॉड्रिग्स आणि रिचा घोष यांसारख्या खेळाडू आहेत. त्याचबरोबर गोलंदाजीत पूनम यादव राजेश्वरी गायकवाड या नावांचा समावेश आहे. संघ संतुलित दिसत आहे. दुसरीकडे, सुपरनोव्हासच्या फलंदाजीची जबाबदारी कर्णधार हरमनप्रीत कौरवर असेल. त्यांच्याशिवाय तानिया भाटिया आणि प्रिया पुनिया याही फलंदाजीसाठी ओळखल्या जातात. गोलंदाजीत या संघात मानसी जोशी आणि मेघना सिंग अशी नावे आहेत. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
दोन्ही संघांची Playing 11
ट्रेलब्लेझर्स – स्मृती मंधाना (कप्तान), जेमिमा रॉड्रिग्स, पूनम यादव, हेली मॅथ्यूज, सोफिया डंकले, राजेश्वरी गायकवाड, अरुंधती रेड्डी, सलमा खातून, रेणुका सिंग, रिचा घोष (यष्टीरक्षक), शर्मीन अख्तर.
सुपरनोव्हास – डिआंड्रा डॉटिन, प्रिया पुनिया, सुन लुस, हरमनप्रीत कौर (कप्तान), हरलीन देओल, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), सोफी एक्लेस्टोन, अलाना किंग, व्ही. चंदू, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

