🕒 1 min read
मुंबई : आमच्या पक्षात या, तरच तुम्हाला राज्यसभेची उमेदवारी देऊ, असं शिवसेनेकडून संभाजीराजेंना सांगण्यात आलं आहे. यावर आता मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी आक्रमक भूमिका केली आहे.
शिवसेनेत प्रवेश करावा मगच त्यांना पाठिंबा देऊ अशा प्रकारचे अटी शर्तीचे राजकारण शिवसेना नेतृत्वाकडून होणं चुकीचे आहे. तुमचा पक्ष व राजकारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने चालतो त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना राज्यसभेत पाठवण्यासाठी अटी शर्ती ठेवता हे योग्य नसून शिवसेनेने याबाबत पुनर्विचार करावा, अशी भूमिका बाळासाहेब शिंदे यांनी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
