Share

IPL Playoffs 2022 : …तर RCB न खेळताच पडणार स्पर्धेबाहेर! जाणून घ्या प्लेऑफ-फायनलचे ‘नवे’ नियम!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL Playoffs 2022)च्या प्लेऑफ फेरीला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने असतील. यानंतर बुधवारी लखनऊ आणि बंगळुरू यांच्यात एलिमिनेटर सामना होणार आहे. पण, या सामन्यांपूर्वी बीसीसीआयने एक मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा आयपीएल २०२२च्या प्लेऑफ सामन्यांच्या नियमांशी संबंधित आहे, ज्यामुळे चाहते निराश होऊ शकतात.

या नवीन नियमांनुसार, प्लेऑफ सामन्यांमध्ये पाऊस किंवा हवामान कोणत्याही प्रकारे खलनायक ठरले आणि त्यामुळे सामना वेळेवर झाला नाही, तर सुपर ओव्हरच्या माध्यमातून विजेता निश्चित केला जाईल. जर हा सामना कोणत्याही प्रकारे थांबवला तर ६-६चेंडूंचा सामना होईल. एवढेच नाही तर सामना झाला नाही, तर साखळी फेरीत चांगली कामगिरी करणाऱ्या संघाला विजेता घोषित केले जाईल.

गुजरात आणि राजस्थान यांच्यात मंगळवारी होणाऱ्या सामन्यात एकही चेंडू टाकला नाही तर हार्दिक पंड्याचा संघ विजेता घोषित केला जाईल. कारण यंदा पॉइंट टेबलमध्ये पंड्याचा संघ सर्वाधिक सामने जिंकून पहिल्या स्थानावर कायम आहे. लखनऊ-बंगळुरू सामन्यातही तेच होईल. या सामन्यात कोणत्याही प्रकारे खेळ थांबला, तर फाफच्या नेतृत्वाखालील संघाला आयपीएलमधून न खेळताच परतावे लागेल.

आयपीएल २०२२चा पहिला क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामना कोलकाता येथे खेळवला जाईल. गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने कहर केला आहे. चाहत्यांसाठी वाईट बातमी म्हणजे पुढील आठवड्यापर्यंत असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!