🕒 1 min read
मुंबई : अमेरिकन गायिका मॅडोनाने इंस्टाग्रामवर अश्लील फोटो शेअर केल्यामुळे इंस्टाग्राम व्यवस्थापनाकडून इशारा मिळाला आहे. इंस्टाग्रामवर अश्लील फोटो शेअर केल्यामुळे इंस्टाग्रामवर लाईव्ह येण्यास बंदी घातली आहे. यासंदर्भात मॅडोनाने इंस्टाग्रामवरून व्हिडीओ शेअर करत सांगितले की, फोटो शेअरिंग अॅपकडून इशारा मिळाल्यामुळे लाईव्ह येऊ शकत नाही. तिला जेव्हा समजले ती लाईव्ह जाऊ शकत नाही तेव्हा तिला खूप धक्का बसला.
मॅडोनाने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती म्हणाली, ‘मित्रांनो’ मला लाईव्ह पासून ब्लॉक केले गेले आहे? हे काय होतंय? त्यावेळी ती पूर्णपणे तयार नव्हती असे देखील तिने सांगितले. मॅडोनाला इशारा देत इंस्टाग्रामने लिहिलं की, “फोटो शेअरिंग अॅपच्या सर्व नियमांचा आदर आणि कोणतेही अश्लील फोटो पोस्ट करू नका. इंस्टाग्राम हे सगळ्या लोकांसाठी सुरक्षित ठिकाण राहावे अशी आमची इच्छा आहे. फक्त तुमचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करा आणि सर्व नियमांचे पालन करा.”
https://www.instagram.com/p/CcoVTbQA-Fr/
नोव्हेंबर 2021 मध्ये, मॅडोनाने तिच्या काही अश्लील चित्रांची मालिका प्रसिद्ध केली व बेडवर पोज देताना देखील दिसली. मॅडोनाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाले होते. इंस्टाग्रामने कोणतीही पूर्वसूचना न देता ते फोटो काढून टाकले यावर मॅडोना चिडली आणि म्हणाली, मला पूर्वसूचना सूचना नाही दिली त्यामुळे मी फोटो परत पोस्ट करणार.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
