Share

‘काँग्रेसशिवाय देशातील विरोधकांची मोट बांधणं अशक्य, नेतृत्व सामूहिक असेल’

Published On: 

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेचा रंगलेला विषय म्हणजे भाजपविरोधात आघाडीची मोट बांधणे. यामध्ये काँग्रेसशिवाय मोट बांधणे अशक्य असल्याचे वक्तव्य राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी काँग्रेसबाबात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधीपासून स्पष्ट भूमिका घेतल्याचं सांगितलं आहे. काँग्रेसशिवाय देशातील विरोधी पक्षांची मोट बांधण अशक्य आहे, असं मत शरद पवारांचे आहे. काँग्रेससह नॉन युपीएच्या खासदारांची संख्या 150 आहे, यांना पण सोबत आणणे गरजेचं आहे, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

आगामी काळात काँग्रेससकट सर्व विरोधी पक्षांची मोठी आघाडी होईल. त्याचं नेतृत्व कोण करेल हा विषय आत्ता महत्वाचा नाही. सामुहिक नेतृत्व असेल. काँग्रेसशिवाय विरोधकांची एकजुट शक्य नाही. हे आधीपासून गेल्या वर्षभरापासून शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. आम्हीदेखील हेच म्हणत आहोत. ममता बॅनर्जींचेही तेच म्हणणं आहे. सर्व विरोधक एकजूट केले पाहिजेत. निश्चितच आम्ही त्यानुसार काम करु, असेही नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

दरम्यान, सगळ्यांच्या एकजुटीने मोर्चाबांधणी करुन एक पर्याय देशात निर्माण करुन देऊ. निश्चितच 2024 ला आगामी लोकसभेची निवडणुका येतील तेव्हा देशात परिवर्तन होणार, असंही नवाब मलिकांनी माध्यामांशी बोलताना स्पष्ट सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!