Share

उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचे मोठे वक्तव्य;म्हणाले,’भाजपाने लुंगी आणि जाळीदार टोपीवाल्यांच्या…’

Published On: 

उत्तर प्रदेश : नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य(Keshav Prasad Maurya) हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शुक्रवारी(३ डिसें.)प्रयागराजमध्ये भाजपाने आयोजित केलेल्या व्यापारी परिषदेत बोलत असतांना योगींच्या काळात राज्यात लुंगीवाले आणि टोपीवाल्या गुंडांचे दिवस गेले आहेत, असे वक्तव्य मौर्य यांनी केले. उपमुखमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

यावेळी बोलत असतांना मौर्य म्हणाले की,’२०१७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रयागराजमध्ये लुंगीचाप गुंड फिरत होते. डोक्यावर जाळीदार टोप्या घालून आणि शस्त्रे घेऊन ते व्यापार्‍यांना धमकावण्याकरिता वापरत असत. जमिनीचा ताबा घ्यायचे आणि तक्रार न करण्याची धमके द्यायचे. मात्र राज्यात भाजपाचे सरकार येताच टोपी आणि लुंगीच्या विळख्यातून व्यापाऱ्यांची सुटका झाली आहे. अन्यथा, सपा आणि बसपाच्या राजवटीत टोप्या आणि लुंगी घातलेले गुंड व्यापाऱ्यांना धमकावायचे आणि खंडणी वसूल करायचे. आज हे सर्व नाहीसे झाले आहे, कारण भाजपाने टोपी आणि लुंगीछाप गुंडांची दहशत संपवली आहे.’ तसेच व्यापारी व उद्योगपती यांचे उज्ज्वल भवितव्य भाजपाच्या पाठीशी असून व्यावसायिकांच्या बळावर भारतीय जनता पक्षाने २०१४ ते २०१९ पर्यंतच्या सर्व निवडणुका जिंकल्या आहेत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी समाजवादी पक्ष आणि अखिलेश यादव(Akhilesh Yadav) यांच्यावर निशाणा साधत उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री सिद्धार्थनाथ सिंह(Siddharthnath Singh) म्हणाले की,’अखिलेश यादव सांगत आहेत की त्यांचे सरकार आले तर बुलडोझर परत करू. त्यामुळे भाजपाची सत्ता आली नाही तर काय होईल हे लोकांना चांगले समजू शकते. तसेच आम्ही माफिया आणि डॉन लोकांवरच बुलडोझर चालवला आहे, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!