Share

पंजाबमध्ये कंगनाचा निषेध करत शेतकऱ्यांनी गाडी आडवली; व्हिडिओ व्हायरल

Published On: 

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ही अभिनेत्री सातत्याने शेतकऱ्यांना टार्गेट करत असतानाही कंगना राणौतने शेतकऱ्यांवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे तिला टिकेचा सामना करावा लागला होता. आता कंगना पंजाबला (Punjab) गेली असताना तिच्या गाडीवर हल्ला झाला आहे. या दरम्यानचा व्हिडिओ तिने शेअर केला असून प्रचंड व्हायरल झाला आहे.

कंगनाने शुक्रवारी इंस्टाग्राम स्टोरीवर (social media) एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पंजाबमध्ये आहे आणि तिची कार शेतकऱ्यांनी घेरलेली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. व्हिडिओ शेअर करताना कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘मी पंजाबमध्ये प्रवेश करताच माझ्या कारवर जमावाने हल्ला केला. ते शेतकरी असल्याचे सांगत आहेत.’ याशिवाय कंगनाने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती कारमध्ये बसलेली दिसत आहे. यादरम्यान कंगना म्हणते की माझ्या कारला आत जाऊ दिले जात नाही.

“माझं विमान रद्द झाल्याने मी आत्ताच हिमाचल प्रदेशमधून निघाले आहे. पंजाबमध्ये येताच जमावाने मला घेरलं आहे. ते स्वतःला शेतकरी असल्याचं सांगत आहेत. ते माझ्यावर हल्ला करत आहेत आणि वाईट शिवीगाळ करत आहेत. तसेच जीवे मारण्याची धमकी देखील देत आहेत. या देशात खुलेआम या प्रकारचा मॉब लिचिंग सुरू आहे. माझ्यासोबत सुरक्षा रक्षक नसते तर येथे कशी परिस्थिती असती? येथील परिस्थिती अविश्वसनीय आहे.” तसेच “मोठ्या प्रमाणात पोलीस असताना देखील माझ्या गाडीला जाऊ दिलं जात नाहीये. मी कुणी राजकारणी आहे का? मी एखादा पक्ष चालवते का? हे वर्तन काय आहे,” असं कंगनाने सांगितलं. काही वेळाने कंगनाने आणखी व्हिडीओ पोस्ट करत पोलिसांनी तिची गाडी जमावाच्या गराड्यातून सुरक्षितपणे काढून दिल्याचं सांगितलं. तसेच पंजाब पोलिसांचे आभार मानले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!